Type Here to Get Search Results !

वणीत १३ ऑगस्टला भव्य ‘तिरंगा रॅली’; राजकीय बॅनर-झेंडे बाजूला ठेवत नागरिकांचा राष्ट्रभक्तीचा जागर


 वणी : 

        नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा आणि तिरंग्याप्रती असलेला अभिमान व्यक्त व्हावा, या उद्देशाने वणी शहरातील समस्त देशभक्त नागरिकांच्या वतीने गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.



       या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर अथवा झेंडे न वापरता केवळ ‘वणीकर नागरिक’ म्हणून हातात तिरंगा घेऊन नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या उपक्रमातून पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



          रॅलीमध्ये वणी शहरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, धार्मिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ही पदरॅली असून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


  📌  असा असेल रॅलीचा मार्ग :- 


      रॅलीची सुरुवात विश्रामगृह येथून सकाळी ९ वाजता होणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक → खाती चौक → महात्मा गांधी चौक → गाडगे बाबा चौक → काठेड ऑईल मिल चौक → सर्वोदय चौक → रविंद्रनाथ टागोर चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक → लोकमान्य टिळक चौक असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.


      वणी तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक व सांस्कृतिक संघटना तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘तिरंगा रॅली’ यशस्वी करावी, असे आवाहन समस्त देशभक्त नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.


  📌  रॅलीचा तपशील :


📅 तारीख : १३ ऑगस्ट २०२६

⏰ वेळ : सकाळी ९.०० वाजता

📍 प्रारंभ : विश्रामगृह, वणी

🇮🇳 आयोजक : समस्त देशभक्त नागरिक

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image