Type Here to Get Search Results !

वक्तृत्वातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर; वणीमध्ये १६ ऑगस्टला स्पर्धा


वणी : 

            क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वणी येथे स्वातंत्र्य दिन विशेष वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह, पोलीस स्टेशनच्या मागे, वणी येथे होणार आहे.



      स्पर्धेत शालेय व खुला असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. शालेय गटासाठी इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वृक्षसंवर्धन ही काळाची गरज’ हा विषय देण्यात आला आहे. खुल्या गटासाठी ‘भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत : महात्मा ज्योतिराव फुले’ हा विषय आहे.


         शालेय गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५०० व १ हजार रुपये, तर तीन प्रोत्साहनपर पारितोषिके प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार आहेत. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये, तसेच तीन प्रोत्साहनपर पारितोषिके प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम व गौरवचिन्ह देण्यात येईल.


     स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून नोंदणीची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे. शालेय गटासाठी 4+२ मिनिटे, तर खुल्या गटासाठी 5+२ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धा मराठी व हिंदी भाषेत होणार आहे.


      स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रदीप बोरकुटे, रविंद्र आंबटकर, सुरेंद्र बुच्चे आणि शुभम कडू यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


       स्पर्धेचे आयोजन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, वणी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, सावर्ली तसेच OBC (VJ/DNT/NT/SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-झरी-मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image