Type Here to Get Search Results !

लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पालक-शिक्षक सभेचे आयोजन


 वणी :

       येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुख वाडी व रवीनगर शाळेची पालक- शिक्षक सभा दि.७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी देशमुखवाडी येथील शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या पालक सभेला (नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या) पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



       कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 



      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष,माजी आमदार तथा शाळेचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार होते. प्रमुख अतिथी म्हणून लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तथा शाळेचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, पर्यवेक्षिका सौ. सुनीता खुसपुरे, पालक प्रतिनिधी म्हणून सौ नेहा कडू, रागीणी नंदीग्रामवार तसेच श्री सुहास कुसराम, सौ. सरिता कोंडावार उपस्थित होते.



      पालक सभेदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच इतर शैक्षणिक बाबींशी संबंधित विविध प्रश्न, सूचना व अपेक्षा पालकांनी उत्स्फूर्तपणे मनोगतां द्वारे व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना स्वतः उत्तरे देत त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली. पालकांनी केलेल्या सूचना व व्यक्त केलेल्या अपेक्षा रास्त व मार्गदर्शक असून वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यां पर्यंत ज्ञान पोचले पाहिजे हे लायन्स शाळेचे ध्येय असून सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देण्याची ग्वाही देत, पालकांच्या समस्यांचे योग्य निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.



        यावेळी अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनीही पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करावे व नियमित अभ्यासाची सवय लावावी तसेच विद्यार्थांच्या दैनंदिन प्रगतीकडे लक्ष द्यावे.असे आवर्जून सांगितले.



      पालक प्रतिनिधी सौ. नेहा कडू, रागीणी नंदीग्रामवार तसेच सुहास कुसराम व सौ. सरिता कोंडावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील समन्वय व सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले व शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.तसेच शिक्षिका रंजू झाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.



      कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ. सुनीता खुसपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलनाज शेख व सौ.भारती वानखेडे, तर आभार प्रदर्शन मृणाल चौधरी व सौ. शुभांगी बरडे यांनी केले. 


          राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

      पालक सभेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिपाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image