मारेगाव :
तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासनाची भेट घेण्यात आली.
तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विजयभाऊ चोरडिया यांनी प्रशासनाकडे केली. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी विशाल किन्हेकर, सुधाकर गोरे, किशोर नांदेडकर, विजय मेश्राम यांच्यासह शिवसेना महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी तसेच मारेगाव तालुक्यातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल,” अशी भूमिका विजयभाऊ चोरडिया यांनी यावेळी व्यक्त केली.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या