Type Here to Get Search Results !

लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा


वणी :

     लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल (देशमुखवाडी) येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



      प्रारंभी स्वातंत्र्य सेनानी व क्रांतीकारकांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी केजी. टू च्या विद्यार्थ्यांसाठी 'क्रांतीकारकांची वेषभूषा' यांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी क्रांतीकारक व महापुरुषांच्या वेशभूषेत त्यांची प्रसिद्ध वचने सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.



       शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, कला व त्यांच्या योगदानाची देऊन आदिवासींचे हक्क व संस्कृती जतनाचे तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ऑगस्ट क्रांतीचे महत्व समजावून सांगितले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण रोहिणी गोरंटीवार व मृणाल चौधरी यांनी केले.



    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्चना रेडलावार यांनी तर आभार स्नेहा पारोधी यांनी केले. यावेळी शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad