Type Here to Get Search Results !

‎८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी / मंगेश राऊत (उसेगाव) : 

‎        

‎       दिनांक १५ ऑगस्ट २०२६ भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने परिसरातील उसेगाव, कोरा, नारायणपूर, उमरी आणि चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बुक, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.



‎       ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासोबतच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.


          यावेळी विद्यार्थ्यांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा प्रेरणादायी संदेश देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचे तसेच समाजाचे भविष्य घडवावे, असे आवाहन करण्यात आले.



‎     या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, गावातील प्रथम नागरी त्या सोबत गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते इत्यादी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


‎    स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

‎    आपले 

‎- माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad