वणी :
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री मार्कंडेय शिक्षण संस्था, वणीचे सचिव, श्री राहुल रमेश सुंकुरवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत व झेंडा गीत गायले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, कवायती सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेले योगा आणि स्केटिंगचे प्रात्यक्षिक लक्षवेधी होते.
याप्रसंगी श्री मार्कंडेय शिक्षण संस्था, वणीचे अध्यक्ष श्री रमेश सुंकुरवार यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक भूषण अलोणे यांनी आपल्या भाषणात भारताच्या २०४७ च्या विकसित भारत या संकल्पनेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भुमिके बद्दल महत्व सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री राहुल सुंकुरवार यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महत्व सांगितले. यावेळी विश्वस्त सदस्य प्राची सुंकुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या