आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण व पाणी नियोजन यांसारख्या समस्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे कायम आहेत. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समस्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले.
संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व चमत्कार सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आला. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे पुराव्याच्या आधारे विचार करणे व प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव समजून घेणे होय, असे सुरकार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक सादर करून त्यामागील हातचलाखी व विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापक अजय उमरकर, दिपाली मालपे, दिलीप गुळघाणे, राजेश कांबळे व कोरडे सर उपस्थित होते. प्रास्ताविक कोरडे सर, सूत्रसंचालन दिपाली मालपे तर आभार दिलीप गुळघाणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल गरड, प्रल्हाद बिडकर, अश्विनी थोटे, संतोष साटोटे, मिलिंद सरोदे, वंदना गारगाये, वैशाली चिव्हाणे, कल्पना अडकिने, वंदना उभाट, करुणा हेगे व चंदन भूरके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

