येथील जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी निवर्तमान अध्यक्ष अॅड. कुणालबाबू चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी वर्ष २०२६-२७ साठी अॅड. कुणाल विजय चोरडिया यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करीत त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षांच्या अनुमतीने सभेत वर्ष २०२६-२७ ची नूतन कार्यकारिणी तसेच वरिष्ठ सल्लागार समिती जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी शुभमजी मदान व श्याम लाहारिया, कार्याध्यक्ष राहुलभाऊ मुंजेकर, सहकार्याध्यक्ष अभय नागतुरे, सचिव उमेश पोद्दार, सहसचिव सुधीरभाऊ तालसे, कोषाध्यक्ष जयंत पांडे, सहकोषाध्यक्ष राजू रिंगोले, संयोजक अमोल धानोरकर यांची निवड करण्यात आली.
प्रसिद्धी प्रमुख म्हणून आशिषजी सिसोदिया (जैन), सहप्रसिद्धी प्रमुख दीपक पाऊणकर, सोशल मीडिया प्रमुख पार्थजी त्रिवेदी आणि प्रिंट मीडिया प्रमुख सौरभ राजुरकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
वरिष्ठ सल्लागार समितीमध्ये विजयजी चोरडिया, आशिषजी गुप्ता, निकेतजी गुप्ता, विजय पुण्यानी, दिवानजी फेरवानी, मूलचंदजी जोशी, राजाभाऊ बिलोरिया, महावीर कटारिया, नारायण गोडे, सुरेश मांडवकर, संतोष मार्कंडे, अनिल रेभे, विशाल दूधबडे, गजानन बत्तुलवार, पिंकी बत्रा, प्रा. दिलीप अलोणे आणि मयूरजी गेडाम यांचा समावेश करण्यात आला.
दरम्यान, आगामी त्रिदिवसीय जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य रॅलीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. उत्सवाचे नियोजन अधिक चोख व नेटके व्हावे यासाठी विविध उपसमित्यांचीही घोषणा करण्यात आली.
उत्सवाचे दरवर्षीचे प्रमुख आकर्षण असलेली भव्य नृत्य स्पर्धा यंदाही जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समितीच्या वतीने मोठ्या स्वरूपात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या जन्माष्टमी महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगत वाढणार आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल दूधबडे यांनी केले. बैठकीस समितीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या