शहरातील नवीन वाघदरा येथील जनक पार्क परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरत स्वतःचे अस्तित्व लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमावर वणी पोलिसांनी कारवाई केली. ही घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, वणी शहरात पेट्रोलिंगवर असताना पोलिसांना एका इसमाबाबत गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार पोलिस पथक जनक पार्कच्या कमानीमागील परिसरात पोहोचले असता एक इसम अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव महादेव रामदास कोडापे (वय ३०), रा. वणी, ता. वणी, जि. यवतमाळ असे सांगितले.
रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत त्याच्याकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत कारवाईची नोंद केली. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२२ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या