पाटण :
शिक्षणाची कास धरत असतानाच विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुणांना चालना देऊन अंगभूत कौशल्ये विकसित करावीत. निरोगी जीवनासाठी व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेसाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन सुप्रसिद्ध लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांनी केले.
पाटण येथील राजीव विद्यालय तथा राजीव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. अलोने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय मेंगनवार होते, तर मुख्याध्यापक सतीश दासपतवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी रमेश पडळवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्वप्निल पैलवान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप अलोने यांनी विद्यार्थ्यांना हसवत-खेळवत विविध गमतीजमती सांगून मार्गदर्शन केले. यशस्वी जीवनासाठी तत्परता, तपश्चर्या आणि तपस्वी वृत्ती यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाला विठ्ठल मुनगेलवार, किशोर द्यावारतीवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या