Type Here to Get Search Results !

रात्रीपर्यंत सगळं ठीक… सकाळी गोदामातून ११ बॉक्स गायब!


 मारेगाव :

 

            तालुक्यातील नवरगाव येथील विराणी ब्रदर्सच्या परवानाधारक देशी दारूच्या दुकानाच्या गोदामातून अज्ञात चोरट्याने देशी दारूचे ११ सिलबंद बॉक्स चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. चोरी झालेल्या मालाची किंमत सुमारे ३३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.


         फिर्यादी विजय जगन्नाथ पोलजवार हे विराणी ब्रदर्स देशी दारूच्या दुकानात मागील २० वर्षांपासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट रोजी दुकानासाठी ९० एमएल क्षमतेचे ११० बॉक्स आणि १८० एमएल क्षमतेचे ५ बॉक्स असा एकूण ११५ बॉक्स देशी दारूचा साठा गोदामात ठेवण्यात आला होता.


         १७ ऑगस्ट रोजी रात्री दुकान बंद करण्यापूर्वी गोदामातील साठ्याची मोजणी केली असता ९० एमएल क्षमतेच्या देशी दारूचे ७२ बॉक्स शिल्लक असल्याचे आढळून आले होते. मात्र, १८ ऑगस्ट रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर गोदामातून माल काढण्यासाठी पाहणी केली असता काही पेट्या खाली पडलेल्या दिसल्या. त्यानंतर गोदामाची तपासणी केली असता छतावरील काही कौले काढलेली आढळून आली.


          या मार्गाने अज्ञात व्यक्तीने गोदामात प्रवेश करून ९० एमएलच्या १०० बाटल्या असलेले ११ सिलबंद बॉक्स चोरून नेल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. प्रत्येक बॉक्सची किंमत ३ हजार रुपये असून चोरी झालेल्या एकूण मालाची किंमत ३३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.


          या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेगाव पोलीस ठाण्याच्या पोहेकॉ कोरवते हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image