Type Here to Get Search Results !

रात्री ९ वाजता फोन आला… अन् काही वेळातच झाला मोठा राडा! नेमकं काय घडलं ?


 वणी : 


      नायगाव खुर्द येथील महालक्ष्मी रिसॉर्टच्या परिसरात दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींना हटकले असता तरुणावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्लास्टिकच्या खुर्ची व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी सुमित रविंद्र तुरणकर (वय ३१) यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


        तक्रारीनुसार, रात्री सुमारे ९ वाजता सुमित तुरणकर यांना त्यांचा मित्र विनोद चोपणे यांचा फोन आला. महालक्ष्मी रिसॉर्टचे चौकीदार सुरेश आवारी यांनी रिसॉर्टसमोर दोन व्यक्ती दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याची माहिती दिल्याने सुमित व विनोद हे रिसॉर्टच्या गेटजवळ गेले. पोलिस तक्रारीनुसार, त्यांना पाहताच दोघे पळू लागले. त्यापैकी एका व्यक्तीला पकडून विचारणा केली असता त्याने आपले नाव गोलू शेख, रा. वणी असे सांगितले.


             यानंतर पळून गेलेला दुसरा व्यक्ती परत आला आणि त्याने काही जणांना फोन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. काही वेळाने आलेल्या व्यक्तींनी सुमित व विनोद यांना अश्लील शिवीगाळ करून सेटलमेंट करण्याची भाषा केली. त्यानंतर ते निघून गेले; मात्र काही वेळाने आणखी लोकांसह परत येऊन रिसॉर्टच्या गेटवरून उड्या मारून आवारात प्रवेश केला.


               तक्रारीनुसार, या जमावाने सुमित व विनोद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका व्यक्तीने प्लास्टिकची खुर्ची उचलून सुमित यांच्या डोक्यात मारली, तर लाकडी दांड्याने शरीरावर मारहाण करून दुखापत केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, गावातील नागरिक घटनास्थळी आल्याने हल्लेखोर तेथून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी सुमित यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले.


                या प्रकरणी सुमित तुरणकर यांच्या तक्रारीवरून आयान, जिहान, मोबीन, संकेत, रेहान शेख यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १९१(२), १९१(३), २९६, ३(५), ३२९(३), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad