Type Here to Get Search Results !

श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या शाळांचा संयुक्त स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


 वणी : 


       येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी पब्लिक स्कूल आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.


      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा सर होते. प्रमुख अतिथी म्हणून राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी, वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. सतीश बाविस्कर तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. सिद्धांत तेलतुंबडे उपस्थित होते.


       यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


       कार्यक्रमाचे संचालन कु. तनिषा चकेरे व कु. पल्लवी खिरटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. काजल आसुटकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad