शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वणी विधानसभा मतदारसंघातील निलजई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन शाखेची स्थापना करण्यात आली. शाखेच्या फलकाचे अनावरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा लोकसभा संपर्कप्रमुख संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निलजई येथील नवीन शाखेमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसैनिकांचा उत्साह, निष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकी हीच पक्षाची खरी ताकद असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाप्रमुख संजयभाऊ निखाडे, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, शाखाप्रमुख संजयभाऊ जांभुळकर, उपशाखाप्रमुख मंगेश तुरानकर, सचिव आशिष आगरकर, कोषाध्यक्ष विनोदजी जांभुळकर, सहसचिव तिलक डोंगरे, संघटक अनंता फुलगरे, सहसंघटक विनोद उ. जांभुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
निलजई येथील नवीन शाखेच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून आगामी काळात शिवसेनेचा जनाधार वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या