Type Here to Get Search Results !

विठ्ठलवाडीत भक्तीचा जागर, एकल भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


 वणी : 

        गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भव्य एकल भजन स्पर्धा, उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.


        या स्पर्धेत परिसरातील ४८ नामवंत भजनी कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संकल्पगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक भजनी कलेचे महत्त्व अधोरेखित करत आजच्या तरुण पिढीने हा सांस्कृतिक वारसा पुढे चालवावा, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी उद्घाटनीय भाषणातून केले. त्यांनी भजनी कलाकारांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.


         स्पर्धकांनी राष्ट्रसंतांची भजने सादर करून संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन काढले. पुरुष गटातून हरिभाऊ भट यांनी प्रथम, पवन खिरटकर यांनी द्वितीय, तर धुळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटातून माया रासेकर यांनी प्रथम, रजनी मांडवकर यांनी द्वितीय, तर सावेताई यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.


        या स्पर्धेसाठी राजेंद्र कोरडे, विजया दहेकर व नंदगिरवार दादा यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत पचारे, तर उद्घाटक म्हणून ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे उपस्थित होते.


       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद राजुरकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा प्रचार प्रमुख मारोती ठेंगणे यांनी केले, तर आभार शारदा बलकी यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


        कार्यक्रमाला परिसरातील भजनी कलावंत तसेच रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देविदास शेटे, पुंडलिक धोबे, संजय खाडे, लक्ष्मण जुमनाके, ज्ञानेश्वर कडुकर, शंकर किनाके, नाना बदखल, मनोहर झाडे, बाबाराव कुडमेथे, भय्याजी तेजे, प्रभा आसेकर, संगीता पेंदोर, सिंधू गिरडकर, बेबी दानव, रुंदा पाटेकर तसेच गुरुदेव उपासकांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad