काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. इजहार शेख यांच्या वाढदिवसानिमित्त वणी येथे त्यांच्या कार्याचा गौरव करत अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माजी आमदार श्री. वामनराव कासावार यांच्या वणी येथील निवासस्थानी (काँग्रेस पक्ष कार्यालय) आयोजित काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बैठकीनंतर इजहार शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्यासह विविध चालू घडामोडींवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शन माजी आमदार श्री. वामनराव कासावार यांनी केले. बैठकीस वणी नगर परिषदेचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे नवनियुक्त प्रदेश सचिव श्री. आकाश भाऊ बदकी तसेच श्री. प्रदीप खेकारे यांचाही सत्कार करण्यात आला.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या