Type Here to Get Search Results !

शिष्यवृत्ती परीक्षेत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे घवघवीत यश; वणी तालुक्यातील अंतिम निवड यादीतील ७ पैकी ६ विद्यार्थी शाळेचे


 वणी : 

     तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल (रविनगर), वणीने केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) अंतिम निकालात शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, वणी तालुक्यात अंतिम निवड झालेल्या एकूण ७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६ विद्यार्थी हे लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे असल्याने शाळेने आपल्या दर्जेदार शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.


       शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वरा विनोद उईके, भुविक राहुल करमरकर, गोजिरी रविकांत बोधाने, औंश विजय उपाध्ये, आरोही प्रमोद कळसकर आणि नैतिक गणेश ढुमणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक तसेच संपूर्ण परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

        या उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे मोलाचे सहकार्य तसेच शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांच्या प्रभावी शैक्षणिक नियोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला. गुणवत्तावृद्धीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा या यशात मोठा वाटा असल्याचे शालेय व्यवस्थापनाने सांगितले.


       विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वैशाली पिसे, भारती वानखेडे, सपना राजूरकर आणि प्रीती तुरणकर यांनी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. शिक्षकांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे यश शक्य झाल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले.


       शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची महत्त्वपूर्ण कसोटी मानली जाते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत वणी तालुक्यातील अंतिम निवड यादीत एकाच शाळेच्या तब्बल ६ विद्यार्थ्यांची निवड होणे ही शाळेसाठी गौरवास्पद बाब असून, या यशामुळे संपूर्ण तालुक्यात लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक होत आहे.


       विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक शमीम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, मुख्याध्यापिका चित्रा देशपांडे, शिक्षकवृंद, पालक आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


      शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षांतील सातत्यपूर्ण यश आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या कटिबद्धतेच्या बळावर लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल (रविनगर), वणीने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध करत यशाची नवी उंची गाठली आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad