Type Here to Get Search Results !

पहाटे उघडकीस आली दुकानफोडी; रोकड आणि चांदीची नाणी चोरीला


 वणी :


       तालुक्यातील राजूर कॉलरी येथे अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील रोकड व इतर मुद्देमालासह एकूण २४,२०० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.


         याप्रकरणी सुरेश मुक्तार सिंह (वय ६८, रा. राजूर कॉलरी, ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते पश्चिम कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मधून सन २०१७ मध्ये निवृत्त झाले असून सध्या आपल्या भाऊ अमरेश मुक्तार सिंह यांच्यासह राजूर कॉलरी येथे किराणा दुकान चालवितात.


     दि. २९ जुलै रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. त्यानंतर दि. ३० जुलै रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता फिरण्यासाठी बाहेर पडले असता दुकानाचे कुलूप तुटलेले व लोखंडी शटर उचकटलेले दिसून आले. दुकानाची पाहणी केली असता गल्ल्यातील २१ हजार रुपये रोख, ३ हजार रुपये किमतीची चांदीची पाच नाणी तसेच २०० रुपये किमतीचे दोन चॉकलेटचे डबे असा एकूण २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले.


        या प्रकरणी सुरेश मुक्तार सिंह यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 305(a) व 334(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad