Type Here to Get Search Results !

संजय देरकरांचा मास्टरस्ट्रोक, 207 शिक्षक स्वयंसेवकांना मंजुरी


वणी : 

        आमदार संजय देरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील खाणबाधित भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी २०७ शिक्षक स्वयंसेवकांच्या दहा महिन्यांच्या कंत्राटी नियुक्तीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेसाठी खनिज विकास निधीतून १ कोटी ५५ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ३१ लाख ५ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.


       या निर्णयानुसार वणी तालुक्यास ४७, मारेगाव ४१, झरी-जामणी ५२, पांढरकवडा २२ आणि राळेगाव ४५ असे एकूण २०७ शिक्षक स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत. वणी विधानसभा क्षेत्राला सर्वाधिक ४७ शिक्षक स्वयंसेवक मिळाल्याने शिक्षकांची कमतरता कमी होऊन विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.


        आमदार संजय देरकर यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून तसेच मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय झाल्याचे सांगितले. खाणबाधित भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad