शहरातील वॉर्ड क्रमांक ०८ येथून १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध BNS कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे संबंधित महिला आपल्या मुलगा व मुलीसह आईच्या घरी राहत होती. ११ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान महिला झोपली होती. झोपेतून उठल्यानंतर तिची १६ वर्षीय मुलगी घरात दिसून आली नाही.
मुलगी मैत्रिणीच्या घरी गेली असावी, असा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला. मात्र दुपारी २ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यानंतर मैत्रिणींकडे तसेच परिसरात शोध घेण्यात आला; परंतु तिचा ठावठिकाणा लागला नाही.
मुलगी अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला घेऊन गेले असावे, अशी शंका तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या