Type Here to Get Search Results !

संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली उमरघाटच्या शेतकऱ्यांचे WCL प्रशासनाला निवेदन

वणी : 

            मौजा उमरघाट, ता. मारेगाव, जि. यवतमाळ येथील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आज वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL)च्या वणी नॉर्थ एरिया, भालर येथील माननीय क्षेत्रीय महाप्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.


         निवेदनामध्ये उमरघाट येथील उर्वरित सर्व शेतीजमिनींचा बोर्डा भूमिगत (UG) अथवा घोणसा ओपनकास्ट (OC) खाण प्रकल्पामध्ये समावेश करून त्यांचे एकत्रित अधिग्रहण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ तातडीने देण्याची मागणीही करण्यात आली.


       यावेळी प्रतिनिधींनी सांगितले की, अनेक वर्षांपासून अधिग्रहणाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाचे संयुक्त सर्वेक्षण करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करावी.


      यावेळी डॉ. शंकर वऱ्हाटे, अशोक धोबे, गजानन सरवर, सुभाष जूनधरे, शैलेश खामनकर, गजानन उपरे, संस्कार मोहुर्ले, दिनेश जयस्वाल, संजू आत्राम, गौरव उरकुडे, संदीप चिडे, शंकर बटशेट्टीवार, नितीन गंधेवार, आकाश गज्जलवार, रक्षक नगराळे, उज्वल गंधेवार, संजय गंधेवार, संतोष मोहुर्ले, सतीश बोढे, गजानन झाडे, भीमराव वाधाडे, मेघश्याम उपरे, स्वप्नाली उपरे तसेच अन्य शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad