Type Here to Get Search Results !

पैशांच्या वादाने घेतले हिंसक वळण


वणी : 

‎        दि. 26 जुलै रोजी मागील वर्षीच्या शेतमजुरीच्या मोबदल्याच्या वादातून एका महिलेवर कथित मारहाण झाल्याची घटना राजूर कॉलरी परिसरात घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

‎          पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेने मागील वर्षीच्या कापूस वेचणीच्या मजुरीची रक्कम मागितल्यानंतर संबंधित व्यक्तीसोबत शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान संबंधिताने शिवीगाळ करून महिलेच्या नाकावर हाताने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत महिलेच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

‎        घटनेनंतर महिलेने पतीसह वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad