Type Here to Get Search Results !

बंद शाळा सुरू करा, रिक्त शिक्षक पदे भरा; AISF चा शासनाला इशारा


मारेगाव :

              ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) च्या वतीने मारेगाव येथील भगतसिंग चौकात विविध शैक्षणिक मागण्यांसाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांमार्फत शासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.  


      निवेदनात महाराष्ट्रातील बंद झालेल्या सर्व जिल्हा परिषद शाळा तात्काळ पुन्हा सुरू कराव्यात, बंद होऊ घातलेल्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद करू नयेत, रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, परीक्षा प्रक्रियेत होणारी पेपरफुटी कायमस्वरूपी थांबविण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना कराव्यात, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करावी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) रद्द करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.  


     याशिवाय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच राज्यातील शिक्षण व परीक्षा व्यवस्थेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.  


       शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा AISF च्या वतीने देण्यात आला.  


     या आंदोलनात कॉ. अथर्व निवडिंग, कॉ. अभिजीत नगराळे, कॉ. पियुष सोनुले, कॉ. अनुष्का आत्राम यांच्यासह AISF चे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad