Type Here to Get Search Results !

WCL च्या CSR उपक्रमाला अजय धोबे यांची जोड; १८ जुलैला आरोग्य शिबिर


 वणी : 

           शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरसेवक तथा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांच्या पुढाकारातून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) वणी नॉर्थ क्षेत्राच्या CSR अंतर्गत मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर व औषध वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


       शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, विठ्ठलवाडी, वणी येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.


       नगरसेवक अजय धोबे यांनी WCL प्रशासनाशी समन्वय साधून हा उपक्रम नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला असून, वणी शहर व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच नगरसेविका प्रणाली गणेश देऊळकर यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमासाठी सहेली महिला समिती, वणी नॉर्थ क्षेत्र, क्षेत्रीय मानव संसाधन विभाग तसेच क्षेत्रीय रुग्णालय, भालर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad