Type Here to Get Search Results !

मोठी राजकीय अपडेट! संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर नवी जबाबदारी


 वणी : 

        महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा मतदारसंघातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता समितीच्या वणी विधानसभा सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


      वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा, प्रशासनावरील पकडीचा आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाचा लाभ मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


       मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना दर्जेदार दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतशिवारांपर्यंत पोहोचणारे रस्ते विकसित होणार असून कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होण्यास मदत मिळणार आहे.


       संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नियुक्तीमुळे वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण रस्ते विकासाला अधिक गती मिळेल, तसेच शेतकरी, मजूर आणि ग्रामीण नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक आणि परिणामकारक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


      दरम्यान, या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad