Type Here to Get Search Results !

मरगळ झटकून सज्ज व्हा; वणी-अमरावतीत राजू उंबरकरांच्या बैठकींचा धडाका


 वणी : 

          केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यात संघटनात्मक बैठकींची मालिका सुरू केली आहे.


       मारेगाव, वणी व झरी-जामणी येथे झालेल्या बैठकींमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षबांधणी, बूथस्तरीय संघटन आणि जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करावे, असे आवाहन राजू उंबरकर यांनी केले.


       अमरावती जिल्ह्यातील तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट, मोरशी तसेच अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघांमध्येही आढावा बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये मतदार नोंदणी, नवीन पक्षप्रवेश आणि शाखा बांधणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


      "तुम्ही जनतेमध्ये राहून काम करा, पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे," असे राजू उंबरकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. या दौऱ्यामुळे वणी आणि अमरावती परिसरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad