महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर वरोरा रोडवरील बाजोरिया हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या शिबिरासाठी भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडळाने २०० रक्तपिशव्यांचे उद्दिष्ट निश्चित केले असून ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
या रक्तदान शिबिरात भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याने आपल्या मित्रपरिवारातील व नातेवाईकांतील इच्छुक व्यक्तींनाही रक्तदानासाठी प्रेरित करून सोबत आणावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिबिराची माहिती :
ठिकाण : बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी
दिनांक : २२ जुलै २०२६ (बुधवार)
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.००
संपर्क :
बालाजी भेदोडकर (संयोजक) – ९७३८३४१६१६
विलास डवरे (सहसंयोजक) – ९४०४५२६७६९
वैशाली वातिले (सहसंयोजक) – ९४२१८५१७२५
भारती बदखल (सहसंयोजक) – ८३२९११६७०५
भारतीय जनता पार्टीचे वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाच्या या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या