Type Here to Get Search Results !

Road Missing! मनसेचा WCL ला थेट अल्टिमेटम

वणी : 

       शिवणी ते मुंगोली (इ. २४३) हा जिल्हा परिषद अंतर्गत असलेला रस्ता वेकोलि (WCL) प्रशासनाने बेकायदेशीरपणे बंद करून त्या ठिकाणी मोठा नाला खोदल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करून रस्ता तातडीने पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.


       मनसेने जिल्हा परिषद उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता अनेक वर्षांपासून नागरिक व शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. रस्ता बंद करून नाला खोदल्यामुळे पावसाळ्यात शिवणी व परिसरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.


       येत्या दोन दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह धीरज पिदूरकर, रणजित बोन्डे, मारोती बोटपेले, महेश कुचणकर, सचिन बोरडे, भोला चिकनकर, सुरज काकडे, अनिल वासेकार, धीरज बगवा, प्रदीप बदकल, मंगेश येटे, राहुल काळे व उत्तम इसनकर उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image