Type Here to Get Search Results !

केबल कट, पैसा सेट... पण अखेर पोलिसांनी पकडले थेट!

वणी :   

            यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा, मुकुटबन, राळेगाव, पाटण, पारवा आणि मारेंगाव परिसरात शेतांमधून मोटार पंपांच्या केबल तसेच वीज खांबांवरील ॲल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींसह एका भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले असून, १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.  

  

        स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रंगनाथ नगर परिसरात संशयितांवर पाळत ठेवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सखोल चौकशीत त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान आरोपींनी शेतातील मोटार पंपांच्या केबल तसेच वीज वितरणाच्या खांबांवरील ॲल्युमिनियम तारा चोरून त्याची विक्री केल्याचे उघड झाले. या प्रकरणात शेख अमीर, सैयद अली आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.  

  

        दरम्यान, चोरीचा माल वणी येथील एका भंगार व्यावसायिकाला विकण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून व मालवाहू वाहनातून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी १,११० किलो ॲल्युमिनियम तार, चोरीच्या केबलमधील १४ किलो तांब्याची तार, ९ मोटार पंप, चोरीसाठी वापरलेली दोन मालवाहू वाहने तसेच तार कापण्यासाठी वापरण्यात येणारे कटर असा एकूण १४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

  

         या कारवाईमुळे वणी, पांढरकवडा, मुकुटबन, राळेगाव, पाटण, पारवा आणि मारेंगाव पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण १० चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

      

     सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, सलमान शेख तसेच चालक पोलीस हवालदार सतीश फुके यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad