वणी :
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी व देणगी निधीतील कथित चोरी आणि गैरव्यवहार प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी "रघुपती राघव राजाराम आंदोलन" करण्यात आले. आंदोलनानंतर वणी पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात आंबेडकर चौकातील हनुमान मंदिरात श्रीराम नामाचे भजन व आरती करून करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामांविषयी श्रद्धा व्यक्त करत मंदिराच्या देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत केंद्र व राज्य शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. श्रीराम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असून त्याच्या निधीबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोषी कोणताही असो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वणी पोलिस ठाणे गाठून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस प्रशासनाला दिले.
या आंदोलनासाठी विकेश पानघाटे, जय आबड, श्यामा देवी तोटावार, सुरज पुलेवार, रोहित मालेकर, सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, अशोक चिकटे, राजू अंकवतवार, फरीद शेख, डॉ. प्रेम मेश्राम, अनंत डुंबारे व पांडुरंग पंडिले यांनी पुढाकार घेतला.यावेळी संजय खाडे, प्रमोद वासेकर, ओम ठाकूर, वंदना आवारी, विवेक मांडवकर, करुणा कांबळे, प्रमोद लोणारे, वंदना घाडी, नीलिमा काळे, जयसिंग गोहोकार, सुरेश बसोड, राजेंद्र कोरेडे, जगदीश चौधरी, सचिन पिडूरकर, पांडुरंग गुंजेकर, रवींद्र होकेम, राज काळे, तेजराज बोथे, ज्ञानेश्वर येसेकर, संदेश शंकरकर, मारोती मोवाडे, रवी कांबळे, अशोक नागमीडकर, प्रभाकर मंथनवार, मंगला झिलपे, सुरेखा वडीचार, प्रिया मडावी, मंदा सोनारखत, सविता गंधेवार, सविता रासेकर, कुंदन यातकेलीवार, संध्या रामगिरवार, वामन कुण्णापूरकर, विजय गौरेकर, गिरीश सातपुते यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या