Type Here to Get Search Results !

कुलूप सुरक्षित, पण खिडकीने दिली चोरांना एंट्री; १५ हजारांची रोकड लंपास

 

वणी :


     शहरातील रामपुरा वार्ड परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. ५) उघडकीस आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराव नथ्थुजी जाभुळकर (वय ६५, रा. रामपुरा वार्ड, वणी) हे आठवडी बाजारात हॉटेल व्यवसाय करतात. शनिवारी सकाळी ते पत्नीसह दीपक चौपाटी येथील बाजारात हॉटेलचे साहित्य विक्रीसाठी गेले होते. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता प्रकृती अस्वस्थ असल्याने ते घरी परतले. घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. किचनमधील लोखंडी कपाट उघडे असून त्यातील साहित्य खाली फेकलेले असल्याचे आढळले. कपाटात ठेवलेली शेतीच्या मक्त्यातून आलेली १५ हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  


    तसेच किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी देवराव जाभुळकर यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join SK News WhatsApp Group

वणी चोरी  #वणी #वणीबातम्या #घरफोडी #चोरी #यवतमाळ #क्राईमन्यूज #SKNews #MaharashtraNews

वणी घरफोडी

रामपुरा वार्ड चोरी

वणी पोलीस

यवतमाळ गुन्हे

महाराष्ट्र क्राईम न्यूज

House Theft Wani Wani Crime News

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या