Type Here to Get Search Results !

डॉक्टर डे वृक्षारोपणाने साजरा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

वणी :

          राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सागरझेप बहुउद्देशीय संस्था, वणी (जि. यवतमाळ) यांच्या वतीने वृक्षारोपण करून डॉक्टर डे उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) वणीचे अध्यक्ष डॉ. संकेत अलोणे तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


          यावेळी डॉक्टरांच्या समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. एखाद्या व्यक्तीला आजारपण, अपघात किंवा गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास डॉक्टर आपल्या ज्ञान, अनुभव आणि सेवाभावाच्या जोरावर रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करतात. अशा सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली.


         वृक्षारोपणानंतर डॉ. संकेत अलोणे व डॉ. अनिकेत अलोणे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वणी परिसरात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून वृक्षतोड, कोळसा खाणींमुळे वाढते तापमान आणि भूजल पातळी घटण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भविष्यातील पिढ्यांचा विचार करून जास्तीत जास्त वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे. वणी परिसर हिरवागार करण्यासाठी डॉक्टर म्हणूनही आपण सक्रिय योगदान देऊ, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


        या कार्यक्रमाला सागरझेप बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सागर मुने, दिनेश अँड्रसकर, परम अँड्रसकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad