Type Here to Get Search Results !

वणीतील न.प. शाळा क्र. 7 मध्ये उत्साहात प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप


वणी : 

          राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.


      कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली. बँड पथकाच्या गजरात नगर परिषद अध्यक्षा विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, नगरसेविका वैशाली वातीले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर आणि मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या हस्ते पुष्पवर्षाव करून तसेच हार घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.


        यानंतर प्रवेशोत्सव मेळावा-2 चे उद्घाटन नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेची चाचणी घेऊन त्यांच्या शैक्षणिक स्तराचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.


      मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली उपस्थिती कौतुकास्पद असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.


      मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी नवीन शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले.


      कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन दिगंबर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर आणि सौरभ बहादे यांनी परिश्रम घेतले. पालकांचीही यावेळी लक्षणीय उपस्थिती होती.



Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad