Type Here to Get Search Results !

मारेगावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; १५ दिवसांनंतरही प्रशासनाची दखल नाही


मारेगाव : 

      वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव तहसील कार्यालयासमोर शिवधुरा (पांदण) रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला १५ दिवस पूर्ण झाले आहेत. शेतकरी संदीप उमरे यांच्यासह घोडदरा येथील रुपाली रोगे व शालूताई जीवतोडे या महिला शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणात सहभागी असून भर पावसातही आंदोलन सुरू ठेवले आहे.


       आंदोलकांनी अनेकवेळा तहसील प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला शिवधुरा (पांदण) रस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


       राजू निमसटकर यांनी प्रशासनावर उदासीनतेचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. मागणीची तातडीने पूर्तता करून रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.




Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad