Type Here to Get Search Results !

BNS आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल! वणीतील १७ वर्षांच्या मुलीला फसवणारा तरुण फरार


 वणी :

       प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत एका २० वर्षीय तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची थरारक घटना वणीमध्ये समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून, वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि नव्या कायद्यानुसार (BNS) गुन्हा दाखल केला आहे.

 

  काय आहे संपूर्ण प्रकरण ?


       मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथील रहिवासी असलेला साहिल काळे (वय २० वर्ष) याचे वणी तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीसोबत मागील ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. ५ डिसेंबर २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत आरोपीने पीडितेशी जवळीक साधली. 'मी तुझ्याशीच लग्न करेन' असं सांगून त्याने तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले.


 मुलगी राहिली गरोदर, अन्...


       या सात महिन्यांच्या काळात पीडित मुलगी गरोदर राहिली. आरोपीने लग्नास नकार दिल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठले. तिच्या जबाबावरून वणी पोलिसांनी ३० जून रोजी आरोपी साहिल काळे विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


 या कलमांनुसार गुन्हा दाखल :


        BNS कलम ६४(१), ६९(बलात्कार आणि लग्नाचे खोटे आश्वासन देणे), पोक्सो (POCSO) कलम ४ आणि ६ (अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार)


  तपासाची चक्रे वेगवान :


       या गंभीर प्रकरणाचा तपास वणी पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी सपोनी प्रियंका चौधरी  या करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.


Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad