Type Here to Get Search Results !

मारेगाव पंचायत समितीला नव्या दमाचे सहा केंद्रप्रमुख; शिक्षण प्रशासनाला मिळणार गती


 मारेगाव : 

    महाराष्ट्र शासनाने विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे राज्यातील केंद्रप्रमुखांच्या २,४१० रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पार पडलेल्या निवड प्रक्रियेत मारेगाव पंचायत समितीला सहा नव्या केंद्रप्रमुखांची नियुक्ती मिळाली आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील शिक्षण विभागाचे प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


      राज्य परीक्षा परिषदेमार्फत IBPSच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत राज्यभरातील ३८ हजारांहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. गुणवत्ता यादी तसेच TET/CTET पात्रतेच्या निकषांनुसार उमेदवारांची निवड करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील ८९ केंद्रप्रमुख पदांसाठी समुपदेशन प्रक्रिया पार पडली.


      या प्रक्रियेनुसार मारेगाव पंचायत समितीअंतर्गत मंगेश खामनकर यांची मारेगाव केंद्रावर, प्रवीण बेहरे यांची वरुड केंद्रावर, पूजा गोडबोले यांची बोटोनी केंद्रावर, विजय घोडमारे यांची मार्डी केंद्रावर, विजय खोब्रागडे यांची नवरगाव केंद्रावर, तर चिनू निरंजने यांची कोलगाव केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियुक्त झालेले हे तरुण, कर्तृत्ववान आणि नव्या दमाचे केंद्रप्रमुख शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळांचे प्रभावी नियोजन, तसेच शिक्षण विभागाचे प्रशासन अधिक कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या