Type Here to Get Search Results !

School Route की Adventure Track? नांदेपेरा मार्ग दुरुस्तीची शिवसेनेची मागणी


 वणी : 

        शहरातील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल ते नांदेपेरा चौफुलीपर्यंतचा रस्ता अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.


        शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, पालक, शाळा बस, रिक्षा तसेच विविध प्रकारची वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


      पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघातांची शक्यता वाढली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वाहने घसरून पडण्याच्या घटनाही घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.


         या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीच्या कामांना प्राधान्याने मंजुरी द्यावी व कामे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.


         यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, धिरज राजुरकर, अनिल उलमाले, अजिंक्य शेंडे, वसुधा ढगे, हिमांशु बोहरा, शुभम गोरे, संतोष लक्षट्टीवार, प्रविण पिसे, धर्मा काकडे, उमेश चिडे, कैलास मेश्राम, संदीप वाघमारे, अयाज शेख, साई आंदलवार, राहुल उपाते आणि कपिल कुंटलवार आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57