Type Here to Get Search Results !

वणीत रामरक्षा आंदोलन; अयोध्या देणगी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची संजय देरकरांची मागणी


 वणी : 


      अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित देणगी अपहार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शनिवारी वणी येथे समस्त रामभक्तांच्या वतीने रामरक्षा आंदोलन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. जागृती मारोती मंदिर, आंबेडकर चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते.


       यावेळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली.


       आंदोलनादरम्यान बोलताना आमदार संजय देरकर यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण होणारा निधी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे. त्या निधीच्या कथित अपहारासंदर्भातील आरोप गंभीर असून या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे. तसेच मंदिरासाठी भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वीटा व अन्य मौल्यवान वस्तूंशी संबंधित कथित अनियमिततेचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.


      हा लढा कोणत्याही राजकीय हेतूपेक्षा धर्मरक्षण, पारदर्शकता आणि जनविश्वास टिकवून ठेवण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान रामनामाचा जयघोष करण्यात आला आणि सामूहिक महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.


     या आंदोलनात सहजिल्हाप्रमुख संजय निखाडे, किरण देरकर, शहरप्रमुख विनोद ढुमणे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, नगरपरिषद गटनेते सुधीर थेरे, पंढरी राजुरकर, सचिन कुचनकर, मंगेश मोहितकर, सत्यवान महाकुलकर, दिवाकर उरकुंडे, टीमनताई टोंगे, किर्तीताई देशकर, सविता आवारी, मोरेश्वर उज्वलकर, अनिकेत बदखल, राजू पाटील, प्रकाश कराड, सुरेशराव देशकर, डॉ. जगन जूनघरी, कुंदन टोंगे, महेश सोमलकर, किशोर मोहेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो रामभक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57