Type Here to Get Search Results !

पोलिसांची Safety First! विजय पिदुरकरांची तातडीची मागणी

 वणी : 

       वणी व शिरपूर पोलीस ठाण्यांची शंभर वर्षांहून अधिक जुनी व जीर्ण झालेली प्रशासकीय कार्यालये तसेच पोलीस निवासी वसाहती तातडीने मंजूर करून नव्याने उभाराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


       निवेदनात सध्याच्या इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढत असताना सुरक्षित कार्यालये व निवासी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.


      २०१७ पासून या इमारतींच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असूनही अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने नवीन पोलीस प्रशासकीय इमारती व निवासी वसाहती मंजूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad