Type Here to Get Search Results !

Cyber Scam Exposed, वणी कनेक्शन! २५.९९ लाखांचा Money Trail उघड


 वणी : 

             देशभरातील ऑनलाइन फसवणुकीच्या संघटित रॅकेटचा धागा वणीपर्यंत पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (NCRP) आणि SAMANVAY पोर्टलवरील माहितीनुसार वणीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बँक खात्यात देशातील विविध राज्यांतील सायबर फसवणुकीची २५ लाख ९९ हजार ६८ रुपये इतकी संशयास्पद रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


       तपासादरम्यान संबंधित खात्यात १४ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध राज्यांतून रक्कम जमा होऊन ती पुढे विविध खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहारांद्वारे हस्तांतरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूसह २० सायबर फसवणुकीच्या तक्रारींचा मनी ट्रेल या खात्याशी जोडला गेला आहे.


        प्राथमिक तपासात हे खाते 'म्युल अकाऊंट' असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 'म्युल अकाऊंट' म्हणजे सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम लपवण्यासाठी किंवा विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे. या तपासातून देशव्यापी सायबर फसवणूक रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad