Type Here to Get Search Results !

Missing Alert, वणीत 15 वर्षीय मुलीचा शोध सुरू


वणी :
      शहरातील एका परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब हे कामानिमित्त काही महिन्यांपासून वणी येथे वास्तव्यास आहे. गुरुवारी (दि. 23 जुलै) सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरासह शहरात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून न आल्याने अखेर वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.  

           तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad