Type Here to Get Search Results !

‎Health First! आ. संजय देरकर यांच्या पुढाकारातून विठ्ठलवाडीत १७० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी


वणी :

‎.         वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) वणी नॉर्थ क्षेत्राच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत विठ्ठलवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात सुमारे १७० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

‎       शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांची तपासणी करून आवश्यक ती औषधे विनामूल्य वितरित केली. यासोबतच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि विविध आजारांपासून बचावाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी आमदार संजय देरकर, वेकोलीचे जनरल मॅनेजर (ऑपरेशन) ओमप्रकाश फुलारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश रंगणे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.


‎      शिबिरात डॉ. किशन, डॉ. मालविका, डॉ. पवार, डॉ. नरेश यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व सल्ला दिला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वेकोली प्रशासन, वैद्यकीय विभाग, मानव संसाधन विभाग, गुरुदेव सेवा मंडळ तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यावेळी आमदार संजय देरकर यांनी ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. 

    वेकोलीच्या CSR अंतर्गत राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजहितासाठी उपयुक्त असून भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले. शिबिराचे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी स्वागत केले. भविष्यातही अशा मोफत आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या शिबिरासाठी नगरसेवक प्रणाली देऊळकर आणि अजय धोबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad