Type Here to Get Search Results !

‎तिरळे कुणबी समाजाचा मेगा गुणगौरव; टॉपर्ससह कर्तृत्ववानांचाही ग्रँड सन्मान


 

‎वणी :

‎          वणी तालुका कुणबी समाज संघटनेच्या वतीने शेतकरी मंदिर येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाज मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.


‎         कार्यक्रमात शंतनु चौधरी, धनंजय इंगोले, आरोही जाधव, अंशुल गोडे, मयुर गावंडे, श्रावणी भोयर, रिया हरके, होमेश्वरी गाभोळे, आर्या सुके, आर्या चौधरी, ईशांत उमक, सोहम पोहेकर, आरुष खराटे, पार्थ साखरकर, लुकेश्वरी चौधरी, प्राजक्ता भोयर, प्रज्वल चरडे आणि श्रावण पठाडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


‎       याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ईश्वरी राऊत, मोहीन हिवरकर, डॉ. साक्षी भोयर, नीलिमा काळे, नारायण गोडे, विजय ढाले, सुभाष इंगोले, वैशाली वातीले आणि प्रेमिला चौधरी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आयोजित महिला आरोग्य शिबिरात डॉ. प्रज्ञा महाजन, पूजा काळे आणि डॉ. साक्षी भोयर यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली.


‎      उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर यांनी, "समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरणे अत्यंत आवश्यक असून आजच्या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे," असे आवाहन केले. तर सर्व शाखीय कुणबी समाजाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांनी, "बदलत्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणे ही काळाची गरज आहे," असे मत व्यक्त केले.


‎     कार्यक्रमाच्या प्रारंभी विशाखा चौधरी यांनी जिजाऊ वंदना, वैशाली तायडे व वैष्णवी लिमये यांनी स्वागतगीत सादर केले, तर चिमुकली भार्गवी महाजन हिने नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.


‎      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण देवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र ठाकरे, सर्व शाखीय कुणबी समाजाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, वणी, केळापूर व मारेगावचे तालुकाध्यक्ष आशिष काळे, अशोक बेले, प्रकाश पवार तसेच राजेंद्र खांडेकर, वसंतराव पडोळे, डॉ. राऊत आणि प्रा. देविदास गायकवाड उपस्थित होते.


‎      सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक आशिष काळे यांनी तर आभार प्राचार्य प्रशांत गोडे यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत देवडे, अशोक चौधरी, राहुल इंगोले, संतोष भेले, मनीष चौधरी, कार्तिक देवडे, मनोज चौधरी, सचिन पोहेकर, प्रशांत गोमकर, सुमित्रा गोडे, वैशाली तायडे, सविता रासेकर, वैशाली वातीले तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad