Type Here to Get Search Results !

Guru First! गुरुपौर्णिमेनिमित्त भाजपकडून विविध क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान


वणी : 

           भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर बुधवार, दि. २९ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडलाच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.


        या उपक्रमात आध्यात्मिक क्षेत्रातील विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड, धार्मिक क्षेत्रातील हरिभक्त पारायण मुन्ना महाराज तुगनायत, शैक्षणिक क्षेत्रातील गजानन कासावार, सामाजिक क्षेत्रातील निवृत्त शिक्षक बोधे सर, आरोग्य क्षेत्रातील डॉ. सपाट तसेच क्रीडा क्षेत्रातील राजू डवरे यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.


      यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, भारतीय जनता पार्टी वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दीपक पाऊणकर, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे होते. 


       तसेच मंडल सरचिटणीस तथा नगरसेवक लक्ष्मण उरकुडे, नगरसेवक अनिल चिंडालिया, मंडल सरचिटणीस तथा कार्यक्रम समन्वयक हितेन अटारा, मंडल उपाध्यक्ष मनोज सरमुकदम, रोहित वनकर, राजेंद्र साखरकर, गणेश आसूटकर, भारती बदखल, महिला मोर्चा अध्यक्ष नीता पिदुरकर, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी भेदोडकर, श्रेयस हरणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


          गुरुपौर्णिमेनिमित्त समाजाला दिशा देणाऱ्या विविध क्षेत्रातील गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुरुजनांविषयीचा आदर आणि कृतज्ञतेचा संदेश देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad