Type Here to Get Search Results !

गुरु हे शिष्यांचे जीवन समृद्ध करतात : प्राचार्य डॉ. एम.एस. उभाळे

दोंडाईचा :‎       

          "गुरु हेच शिष्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे असतात. ज्ञानासोबतच संस्कार, मूल्ये आणि जीवन जगण्याची कला गुरुंकडूनच मिळते. गुरु शिष्यांचा दृष्टिकोन व्यापक करून त्यांना सक्षम नागरिक बनवतात. त्यामुळे गुरु हे शिष्यांचे जीवन समृद्ध करणारे असतात," असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम.एस. उभाळे यांनी केले. दोंडाईचा येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

‎        कार्यक्रमाची सुरुवात प्रा. रेवती बागुल यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. पी.झेड. झांबरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गुरुपौर्णिमानिमित्तच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

‎      यानंतर चेतना दातेराव, उमा पाटील, जयश्री ठाकूर, मोहिनी सोनार, अजय पवार व प्रियंका पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. गणेश पारखे यांनी गुरुपौर्णिमा प्रतिज्ञा दिली. प्रा. अमृता चव्हाण यांनी जीवनातील भावनांचे महत्त्व अधोरेखित केले, तर प्रा. एस.एम. ठाकरे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून गुरुंचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. पी.झेड. झांबरे यांनी भारतातील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.

‎            अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एम.एस. उभाळे यांनी गुरु-शिष्य नात्यातील मूल्ये आणि आदर्श संबंध यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापकांना विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

‎         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा राजपूत यांनी केले, तर दीपमला भामरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. पी.डी. बोरसे व प्रा. एस.एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. व्यवस्थापनाची जबाबदारी प्रा. रेवती बागुल व प्रा. अमृता चव्हाण यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आर.पी. पाटील, प्रा. डॉ. योगिता चौधरी, प्रा. पी.एल. खाचणे, प्रा. बी.टी. शेजाळ, प्रा. मंजुषा बावने, प्रा. निशा ठाकूर तसेच शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत आणि जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad