Type Here to Get Search Results !

भाजपाने जपला समतेचा वारसा, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन


वणी : 

           संत शिरोमणी संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहर मंडलाच्या वतीने दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोठे हनुमान मंदिराजवळ, वणी येथे सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


    यावेळी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराज यांनी समाजाला दिलेला समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे आचरण समाजहितासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.


        या कार्यक्रमास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, भारतीय जनता पार्टी वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक दीपक पाऊणकर, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, मंडल सरचिटणीस तथा नगरसेवक लक्ष्मण उरकुडे, नगरसेवक अनिल चिंडालिया, मंडल सरचिटणीस तथा कार्यक्रम समन्वयक हितेन अटारा, मंडल उपाध्यक्ष मनोज सरमुकदम, रोहित वनकर, राजेंद्र साखरकर, गणेश आसूटकर, भारती बदखल, महिला मोर्चा अध्यक्षा नीता पिदुरकर, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी भेदोडकर, श्रेयस हरणे तसेच श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष संभा वाघमारे, दौलत वाघमारे, राजू वाघमारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


      यावेळी संत रविदास महाराज यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन करून सामाजिक समरसता, बंधुभाव आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीचा संकल्प व्यक्त करण्यात आला. समाजात समता, मानवता आणि सामाजिक सलोखा दृढ करण्यासाठी संत रविदास महाराज यांच्या शिकवणीचे अनुकरण करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad