Type Here to Get Search Results !

सहकार व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचा गौरव; सौ. संगीताताई खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा


वणी : 


       ग्रामपंचायत उकनीच्या माजी सरपंच तथा श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई संजयभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सामाजिक, सहकार आणि ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचारी, दैनिक अभिकर्ते, सहकारी, हितचिंतक व नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.


      श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था, वणीच्या कर्मचारी वृंद व दैनिक अभिकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य अधिक जोमाने पुढे सुरू राहावे, अशा मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.


        सौ. संगीताताई खाडे यांनी ग्रामपंचायत उकनीच्या माजी सरपंच म्हणून विकासाभिमुख कामे करताना नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य दिले. तसेच श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणून संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांना अधिक चांगल्या आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेने विश्वासार्हता आणि प्रगतीचा वेगळा ठसा उमटविल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


    वाढदिवसानिमित्त त्यांना उज्ज्वल भवितव्य, निरोगी आयुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात अखंड यश लाभो, अशा शुभेच्छा कर्मचारी वृंद, दैनिक अभिकर्ते तसेच असंख्य हितचिंतकांनी व्यक्त केल्या. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad