Type Here to Get Search Results !

वणीतील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


वणी : 

          महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) – २०२६ मध्ये ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल, वणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


       या परीक्षेत नायरा चंद्रकांत झाडे, जोयब जाकीर शेख, कैवल्य अमित वल्लपकर, राघव विजयशंकर सिंह आणि रिध्वी नितीन पाटकुरवार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.


         या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री. अजय पिंपळशेंडे (सिंगापुर),माजी सभापतो प.स. वणी तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय पिंपळशेंडे, प्राचार्या सौ. अश्विनी सचिन ढोले, उपप्राचार्या सौ. पूजा जोबनपुत्रा, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


       विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे कुशल मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश संपादन करता आले, असे यावेळी सांगण्यात आले. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उज्ज्वल यश संपादन करून शाळेचे, पालकांचे व परिसराचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad