Type Here to Get Search Results !

‎Drug Deal फेल! वणी पोलिसांनी गांजासह युवकाला पकडले


 वणी : 

‎       शहर परिसरात अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एका युवकाला गांजासह अटक करण्यात आली. या कारवाईत अंदाजे २८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

         पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. शहरात नियमित गस्त घालत असताना पथकाला एकतानगर येथील नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

‎         चौकशीदरम्यान संशयिताची ओळख सुजल मंगेश गोहोकार (वय २०, रा. एकतानगर, वणी) अशी पटली. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता अंदाजे ३७० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गांजा विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल फोन असा एकूण २८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


‎        ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल (पांढरकवडा विभाग, प्रभार वणी) तसेच पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत डी.बी. पथक प्रमुख पोउपनि सैय्यद साजीद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, श्याम राठोड तसेच पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर आणि चालक शुभम किन्नाके यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad